आनंदनगरी
कॉल-टी ने दिली जगण्याला नवी उभारी ,परिस्तिथीने नडलेल्या युवकाची संघर्ष गाथा , स्वतःसह १६ जणांना दिला रोजगार , गरज तुमची सेवा आमची हे व्रत
कोणाच्या जीवनाला कधी कलाटणी मिळेल? याचा नेम नाही. कोणी संकटाचा बाऊ करतो. तर कोणी त्याच संकटाच्या छाताडावर पाय देऊन स्वताःसह इतरांच्या जगण्याला नवा अर्थ मिळवून देतो. दाही दिशा संकटे ओढावलेले असताना यातून मोठया शिताफीने आणि निश्च्यापुर्वक व तितक्याच धीराने मार्ग काढणे मोठे जिकरीचे होयुन बसते.
गरज ही शोधाची जननी आहे, असे म्हटले जाते, ते सुनिल वाघ यांनी खंर एका खासगी कंपनीतील नोकरी सोडल्यानंतर, दुसऱ्या नोकरीच्या शोधात फिरत असताना सहज रस्त्यावरच्या टपरीवर नजर गेली.तिथे चहा पिण्यासाठी जमलेल्या गर्दीने लक्ष वेधले तर हाच व्यवसाय आपण सुरु केला तर.. हा विचार मनात आला टपरीवर उभे राहून चहा विकावा लागेल, ही कल्पना मात्र मन स्वीकारत नव्हते कारण, आजपर्यंत आपण एक शिक्षक म्हणून काम केले होते.त्या प्रतीमेला धक्का बसू नये अशी इच्छा होती मग एक भन्नाट कल्पना सुचली. चहाची ऑर्डर घेऊन चहा पोहोच करणे. एका कॉलवर चहा विकायचा त्यासाठी एक पॉश सिस्टम डेव्हलप करायची आणि चहा विकायचा हे ठरले आणि त्या दृष्टीने प्रयत्न सुरु झाले.
मात्र,परिस्थितीकडे नुसते निस्तेज डोळ्याने न बघता दोन हात करण्यासाठी जीवनसंघर्षाच्या आखाडयात तो उतरला आणि संकटाला लोळणे घ्यायला भाग पाडले. त्या धेर्यशील तरुणाचे नाव सुनील शंकर वाघ असे आहे.
तो मुळचा जाफ्राबाद तालुक्यातील संगमपूर (मुळचे घाणेगाव) येथील छोटयाशा खेडयातील रहीवाशी आहे. शिकून मोठे होण्याचे स्वप्न उराशी घेवून त्याने औरंगाबाद शहरात पाय ठेवला. यासाठी त्याला आई-बाबांच्या विरोधाला सामना करावा लागला. शहरात येवून त्याने सुरुवातीला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी मित्रांच्या मदतीने शिकवणीवर्ग सुरु केले. यातून घरखर्च निघत असे. पत्नीच्या उपचाराकरीता दरमहा ३० हजार रुपये खर्च येत. खोली भाडे, इतर घरखर्च आदी गरजा या शिकवणीच्या पैशातून भागवल्या जात असे. शिकवणीसाठी लागणारे विद्यार्थी दारोदार फिरून पालकांची मतपरिवर्तन करून विद्यार्थ्याची जमवाजमव केली जात होती.यातून बऱ्यापैकी पैसे मिळत असल्याने सर्व काही ठीक चालले होते.मात्र, अचानक दरड कोसळावी अन् सर्वकाही नष्ट व्हावे, अशी परिस्थिती निर्माण झाली.ज्या मित्रांच्या भरवशावर शिकवणी वर्ग सुरु केले.त्यांनीच घात केला.
शिकवणीचे नाव बदलण्याचा बनाव करून शिकवणीच्या करारातून हद्दपार करण्यात आले. त्यामुळे सुनिल वाघ यांच्या डोळ्यासमोर अंधार पडला. लागलीच पत्नीचा आजार, घरभाडे, घरखर्च आदी यक्ष प्रश्न आवासून उभे राहिले. किलकिल्या डोळ्यांनी त्यांनी केवळ मित्राकडे बघितले आणि हताश होऊन तो घरी गेला.काही सुचेनासे झाले. त्यांनी पत्नीला चहा घेवून येण्याचे सांगितले. थकलेल्या शरीराने आणि खचलेल्या मनाने चहा पिताना सुरु झाला त्यांचा विचार प्रवास. व्यवसाय काय करावा? त्यासाठी भागभांडवल कोठून आणावे? दरमहा २० ते ३० हजार रुपये कोठून आणावे? पत्नीच्या आजाराचा प्रती महिना खर्च कसा भागवायचा? या ना अशा अनेक प्रश्नांनी त्यांच्या मनावर, बुद्धीवर.
माझे पदवी पर्यंत शिक्षण झाले.पत्नीच्या आजारामुळे कमी खर्चात हा व्यवसाय निवडला.सध्या घरखर्च निघून १६ जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे.याचे समाधान मिळते आहे.सुशिक्षित बेरोजगारांनी हिंमत न हरता कोणताही व्यवसाय मनपूर्वक निवडल्यास त्यात त्याला यश मिळेल. माझ्याकडे एमबीए, इंजिनीअर मुले कामाला आहे. येत्या काळात चांगली सेवा देण्यासाठी आम्ही तत्पर राहू. - सुनिल वाघ, व्यवस्थापक.