दिव्य मराठी
टी ऑन अ कॉल
कला आणि आवडीचे रूपांतर व्यवसायात ,कल्पकता वापरून शोधली उद्द्योग संधी, बुकिंग करताच मिळते मागाल तिथे सेवा
ऑनलाईन खरेदीच्या वेडाने आज-काल सगळया दुनियेला भुरळ घातलीय. रेडीमेड क्लोथस, ज्वेलरी, हाऊसहोल्ड प्रोडक्ट्स, वेगवेगळ्या एक्सेसरीज असं आणखीही बरेच काही आपण ऑनलाईन खरेदी करतो. अगदी खाद्यपदार्थसुद्धा. पिझ्झासारखे खाद्यपदार्थ तर एका कॉलवर १० मिनिटांत आपल्यासमोर हजर होतात. मात्र, चहा एका कॉलवर किंवा ऑनलाईन मिळाल्याचे कधी एकले आहे का? औरंगाबादमधील सुनिल वाघ-पाटील यांनी टी ऑन कॉल हा ऑनलाईन चहाचा प्रयोग सुरु केला आहे.याविषयी...
ऑफिसमधल्या सहकार्यांसोबत गप्पाटप्पा मारायच्या असोत किंवा मित्रांबरोबर थोडा वेळ स्पेंड करायचा असो, आठवण येते ती मस्त गरमागरम वाफाळत्या चहाची , तेंव्हा आपोआप पाय वळतात ते रस्त्यावरच्या टपरीकडे किंवा एका टी स्टॉलकडे पण हाच चहा जर पिझ्झासारखा एका क्लिकवर किंवा मेसेजवर तुमच्यापर्यंत आला तर ! किती मस्त होईल ना ! आता तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे हे ! हे शक्य झालेय, औरंगाबादमध्ये टेक्नोसेव्ही युगात हा चहासुद्धा हायटेक झाला आहे. औरंगाबादमधील लोकांना आता एका कॉलवर किंवा मेसेजवर ऑफिस, घर, संस्था या ठिकाणी १० मिनिटात चहा पोहोचतोय.औरंगाबादच्या सुनिल वाघ यांनी ही ऑनलाईन चहाची भन्नाट कल्पना अंमलात आणली आहे.
अशी सुचली कल्पना
गरज ही शोधाची जननी आहे, असे म्हटले जाते, ते सुनिल वाघ यांनी खंर एका खासगी कंपनीतील नोकरी सोडल्यानंतर, दुसऱ्या नोकरीच्या शोधात फिरत असताना सहज रस्त्यावरच्या टपरीवर नजर गेली.तिथे चहा पिण्यासाठी जमलेल्या गर्दीने लक्ष वेधले तर हाच व्यवसाय आपण सुरु केला तर.. हा विचार मनात आला टपरीवर उभे राहून चहा विकावा लागेल, ही कल्पना मात्र मन स्वीकारत नव्हते कारण, आजपर्यंत आपण एक शिक्षक म्हणून काम केले होते.त्या प्रतीमेला धक्का बसू नये अशी इच्छा होती मग एक भन्नाट कल्पना सुचली. चहाची ऑर्डर घेऊन चहा पोहोच करणे. एका कॉलवर चहा विकायचा त्यासाठी एक पॉश सिस्टम डेव्हलप करायची आणि चहा विकायचा हे ठरले आणि त्या दृष्टीने प्रयत्न सुरु झाले.
सुरुवातीचा काळ
सुरुवातीच्या काळात सुनिल आणि त्यांची पत्नी हे दोघेच या व्यवसायात होते. त्यांच्या पत्नी जाधववाडी येथील घरीच चहा बनवून देत होत्या आणि तो चहा सुनिल टीव्ही सेंटर येथील ग्राहकांना देत होते,पहिल्यांदा फक्त या एका भागापुरताच हा व्यवसाय मर्यादित ठेवला होता. त्या भागामध्येच पत्रके वाटून चहासाठी बुकिंग सुरु केले. जाधववाडी ते टी.व्ही. सेंटर असा हा चहाचा रोज प्रवास होत होता.हळूहळू व्यवसाय वाढत गेला आणि हा व्यवसाय हायटेक कसा करता येईल,असा विचार ते करू लागले.
आयुर्वेदीक आरोग्यदायी चहा
दोघा जनांपासून सुरु झालेल्या चहाच्या या हटके प्रयोगाने आज १६-१७ जणांची टीम उभी केली आहे. एरीयावाईज चहा देण्यासाठी मुलांची नेमणूक केली आहे.यासाठी तीन मुले आहेत.तर बुकिंग आणि कॉलिंगसाठी सहा जणांची एक टीम तयार केली आहे.संपूर्ण औरंगाबाद शहराला हा ऑनालाईन चहा पुरविला जातोय.महिन्यासाठी त्यांना या व्यवसायातून १० ते १५ हजार रुपये इतकी मिळकत होते.
फोन/एसएमएस/व्हॉटस्एपवरून बुकिंग
व्यवसायाच्या सुरुवातीस सुनिल यांनी चहाच्या बुकिंगसाठी कार्यालयात जाउन पत्रके वाटली नंतर ते फोनवरुन या ऑर्डर्स घेऊ लागले.या हायटेक युगात सर्व्हीसही आत हायटेक झाली आहे.फोनकॉल बरोबरच एसएमएस, व्हॉटस्एप आणि त्यांच्या वेबसाईटवरुनही चहाची ऑर्डर बुक करता येते. सकाळी सात ते रात्री आठपर्यंत ऑर्डर मिळाल्यानंतर १० ते १५ मिनिटांमध्ये चहा घरपोच मिळतो.
टीमचीही काळजी
संपूर्ण औरंगाबादमध्ये ग्राहकांना चहा पुरविण्यासाठी कार्यरत असलेल्या टीमच्या सुरक्षिततेचाही सुनिल विचार करतात.त्यांनी चहा देण्यासाठी जाणाऱ्या मुलांना हेल्मेट घालणे सक्तीचे केले आहे.
टीमचीही काळजी
संपूर्ण औरंगाबादमध्ये ग्राहकांना चहा पुरविण्यासाठी कार्यरत असलेल्या टीमच्या सुरक्षिततेचाही सुनिल विचार करतात.त्यांनी चहा देण्यासाठी जाणाऱ्या मुलांना हेल्मेट घालणे सक्तीचे केले आहे.
भविष्यातील व्हिजन
सर्वाना आरोग्यदायी चहा मिळणे, अनेकांना रोजगार मिळवून देणे, लोकांचा वेळ वाचविणे.कारण यामुळे कामाची गती वाढेल त्याबरोबरच वेळेचा सदुपयोग होईल. भविष्यात महाराष्ट्रभर फ्रेंचायाझीज निर्माण करून सर्वांनाच आरोग्यदायी चहा मिळवून देण्याची त्यांची संकल्पना आहे. ऑनलाईन चहाच्या व्यवसायात यशस्वी झाल्यानंतर सुनिल आता जेष्ठांसाठी आणि शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी घरगुती पद्धतीचे जेवण करून ते पुरविण्याच्या विचार ते करत आहेत.
सुनिल सांगतात की,आमच्या चहाच्या प्रयोगाला औरंगाबादमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे.आम्ही आता आणखी टेक्नोलॉजीचा वापर करून त्यामध्ये तत्परता आणण्याच्या
प्रयत्नात आहोत.त्यासाठी एक ऍपच्या मदतीने आम्ही औरंगाबादवासियांना आणखी उत्तम सेवा देऊ.
प्रबळ इच्छाशक्ती,प्रगल्भ महतावाकांक्षी यश कवेत घेण्याचे सामर्थ्य माणसाकडे येतच नाही. सामाजिक बांधिलकी
व्यवसायाचे स्वरूप लहान असूनही याच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याच्या प्रयत्नही केला जातो. वृक्षसंवर्धन, गरिबांना मदत केली जाते. आरोग्यपूर्ण चहाचे महत्व पटवून देण्यासाठी पथनाट्यांच्या माध्यमातून प्रबोधन केले जाते.